मुंबई (प्रतिनिधी) मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षकेतरांना सर्व्हिस बुकची दुय्यम प्रत मिळत नसल्याची तक्रार भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
याबाबत अनिल बोरनारे यांनी आज मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन दिले आहे
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ ची नियमावलीनुसार शिक्षक-शिक्षकेतरांना सेवा पुस्तकाची (सर्विस बुक) दुय्यम प्रत व जेष्ठता सूची देणे बंधनकारक आहे. सर्विस बुक ची मूळ प्रत शाळेकडे तर दुसरी प्रत कर्मचार्यांकडे असणे आवश्यक आहे. सर्विस बुक मध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात व दरवर्षी त्या अद्ययावत केल्या जातात. यामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती, शैक्षणिक पात्रता, शिक्षकांनी केलेले प्रशिक्षण, रजा, वेतन आयोगाचे स्टॅम्पिंग व इतर सर्व माहिती असते व वारंवार त्यामध्ये सर्व नोंदी केल्या जातात त्यामुळे या सर्विस बुकला अत्यंत महत्व असते. तर सिनॅरीटी लिस्ट मध्ये जेष्ठता दिली जाते हे दोघेही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दस्तऐवज असतात
तथापि अनेक शाळांमध्ये शिक्षकांना सर्विस बुक न देणे, अद्ययावत न करणे असे प्रकार घडल्याच्या तक्रारी आल्याने शिक्षण उपसंचालकांडे तक्रार करून सर्व शाळांना हे दस्तऐवज शिक्षकांना देण्याची मागणी केल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment