25 जानेवारीपर्यंत संधी : येत्या एप्रिल-मे महिन्यात परीक्षा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णय बोर्डाकडून घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास यापूर्वी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, परीक्षेसाठी नियमित शुल्कासह दि. 12 ते 25 जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
Comments
Post a Comment