महिला शिक्षकांना सोन्याचे नथ तर पुरुषांना रेमंडचे कपडे
मुंबई (न्यूज दिशा ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव येथील सभेनंतर मुख्याध्यापक, शाळा,शिक्षक संघटना यांना पैसे वाटप करण्यात आल्याचे व्हिडिओ ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला होता हे प्रकरण ताजे असतांना आता शिक्षकांचा शेअर बाजार प्रमाणे भाव लावण्यात येत असल्याचा नवा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सगळे सुरु असतांना दुसरीकडे नाशिक मध्ये महिला शिक्षकांना सोन्याचे नथ तर पुरुष शिक्षकांना रेमंड चे कपडे वाटण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. हे सर्व प्रकार उजेडात आल्यानंतर शिक्षक मतदार संघाची निवडणूक तरी अशी झाली नाही पाहिजे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले. ते कशासाठी येतात हे सर्वांनाच माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे. शिक्षकांना विकत घेऊ नका, परंपरा मोडू नका, पदवीधर, शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) संदीप गुळवे आहे.
Comments
Post a Comment