सातवा वेतन आयोगाचा हप्ता खात्यावर जमा करा


प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. या वेतन आयोगाचा पहिला हप्ता शिक्षकांच्या पीएफ खात्यावर लवकर जमा करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना देण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसदर्भात शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात सातव्या वेतनआयोगातील फरकाचा डीसीपीएसधारकांना (अंशकालीन पेंशन योजना) रोखीने देण्यात येणारा पहिला हप्ता त्वरीत देण्यात यावा, डीसीपीएस धारकांच्या दरमहा होणाºया कपातीचा हिशोब संबंधिताना देण्यात यावा, पदोन्नती मुख्याध्यापक व विषय शिक्षकांची लवकर नेमणुक करण्यात यावी, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेत समाविष्ट करावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, राज्य प्रमुख संघटक व जिल्हा सरचिटणिस भुपेश वाघ, प्रभाकर चौधरी, रविंद्र देवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष विलास थोरात, जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सोनवणे आदी उपस्थित होते. दरम्यान सर्वच प्रश्न लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन मनीष पवार यांनी दिले आहे.

Comments

  1. मी एक गरीब घरचा शिक्षक आहे . मला 2009 ल एका शाळेवर नियुक्ती मिळाली पण मी माझी 2 एकर शेती विकून नोकरी साठी दोनिशेन भरले काहीतरी पगार मिळेल व माझ्या घरची मी परस्तीती सुधारून माझी विकलेली जमीन मला परत मिळेल या च आशेवर मी माझी थोडी जमीन विकून नक्री धरली ..पण आज मला दहा वर्ष झाली तरीही मी फक्त 20% च पगार मिळतोय..यात माझे घर तर नाहीच भागत,पण माझा संसाराचा ही गाडा नीट ओढता येत नाही ...
    माझ्या शाळेतील शिक्षक ही वेळी वेळी मला खूप वेळा मदत करतात पण त्यांनाही किती वेळा मागून माझी गरज भागवावी...
    BJP सरकार मदत करेल म्हणून त्यांना मतदान केले पण त्यांनीच माझा संसार रस्त्यावर आणून माझ्यावर वाईट परिस्थिती आणली...माझे काहीही झाले तरी ही या परिस्थितील फक्त आणि फक्त BJP सरकारच जबाबदार असेल...
    आता 100% पागरीचे ही स्वप्न पडणे बंद झालेय...
    खरोखर माझे मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे साहेब तुम्हहीच माझे स्वप्नांना वाढ देऊ शकता...

    ReplyDelete

Post a Comment