शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरी


तीन महिण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ५ जिल्हयात उपक्रम ; शाळांना बंधनकारक 
प्रतिनिधी
मुंबई
केंद्र सरकारच्यावतीने निश्चित ग्रेड इंडेक्सनुसार राज्यातील पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक मशीनच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम तीन महिण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पाच जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर असा प्रकल्प राज्यातील शाळांमध्ये राबविण्याचा विचार राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये आता डिजिटल पध्दतीने हजेरी घेण्यात येणार आहे.
्रराज्यातील अनेक अनुदानित शाळा विद्यार्थ्यांची चुकीची पटसंख्या दाखविण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आहे कीती हे तपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल पध्दतीने ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार पालघर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बायोमेट्रीक मशीच्या माध्यमातून हजेरी घेण्यात येणार आहे. बायोमेट्रीक मशीनमध्ये विद्यार्थ्यांची माहिती आणि त्याचा हाताच्या बोटाचे निशान नोंदवीण्यात येतात. त्यानंतर बायोमेट्रीक मशीनमध्ये बोट लावल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची हजेरी डिजिटल पध्दतीने नोंदवीण्यात येते. त्यामुळे संबधीत विद्यार्थ्यांची हजेरी दाखविण्यासाठी तो विद्यार्थी प्रत्यक्षात हजर असणे आवश्यक आहे. या नव्या पध्दतीने हजेरी घेतल्या शाळांमध्ये प्रत्यक्षात विद्यार्थी रोज किती प्रमाणात येतात. हे काहि मिनीटांमध्ये कळते. शाळांना ही पध्दत राबविण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्यात येणार नसून शाळांना आपल्या पैशानेच हे उपक्रम राबवायचे आहे. तीन महिण्यासाठी हा उपक्रम पाच जिल्हयांमध्ये राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा हजेरीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करायचे आहे. शाळांकडून यासाठी विद्ययुत पुरवठा करण्यात येईल. बायोमेट्रीक मशीन व्यतिरिक्त इतर उपकरणदेखील याड़िजिटल पध्दतीने हजेरी घेण्यासाठी वापरण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र हजेरी डिजिटल पध्दतीनेच हवी अशी सुचना महाराष्ट्र राज्याचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहे.

Comments

  1. हा एक चांगला निर्णय आहे.यामुळे भोगस शाळा आणि विद्यार्थी संख्या निदर्शनास येईल.आणि शैक्षणिक क्षेत्रातील होणार्या भ्रष्टाचाराला आळा बसेल. शिक्षक भरती सुध्दा गुणवत्तेवर आणि एम पी एस सी द्वारे सरळसेवा भरती करण्यात यावी.

    ReplyDelete

Post a Comment