टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध



मुंबई : राज्यात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली असून या परीक्षेचे प्रवेशपत्र परीषदेच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपल्या लॉगीन आयडीवरुन हे प्रवेश पत्राची प्रिंट काढण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
आरटीई कायद्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली असून ही परीक्षा येत्या १९ जानेवारी २॰२॰ रोजी राज्यभरात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांने http://mahatet.in या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने त्यांच्या लॉगईन आयडीवर प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाले नाही अशांनी अर्ज आणि पैसे भरल्याचे कागदपत्रे घेऊन कार्यालयामध्ये संपर्क करायचे आहे. परीक्षेला येताना उमेदवारांना त्यांची ओळख सिध्द करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाकडून दिलेले ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा आणायचे आहे. या ओळखपत्रांवर उमेदवारांचे नाव, गाव, वय, लिंग आणि फोटो असणे आवश्यक आहे. परीक्षेला पोहोचण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हनून वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

Comments