गेल्यावर्षीच्या तुलणेत यंदा प्रवेशामध्ये घट
प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलणेत यंदा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कळाले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ का फिरवली असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात बीएड आणि एमएड धारकांची संख्या वाढली असल्यामुळे प्रत्येकाला शिक्षकाची नोकरी मिळणे कठीन जाले आहे. कौशल्यावर आधारीत अनेक अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रामध्ये उपलब्ध जाल्याने आणि त्यांना संबधीत क्षेत्रात नोकरी मिळण्याची आशा वाढल्यामुळे एमएड आणि बीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये आणखी एक अडचण म्हणजे शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक भरतीवर लादण्यात आलेली बंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा विविध कारणांमुळे बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहे.
राज्यात बीएड अभ्यासक्रम शिकविणाऽया ४९९ महाविद्यालये आहेत. तर एमएड अभ्यासक्रम शिकविणाऽया ६६ महाविद्यालये. राज्यात बीएड अभ्यासक्रमासाठी ३२ हजार ८१५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर एमएड अभ्यासक्रमासाठी ३ हजार १९५ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी २९ हजार ९॰८ विद्यार्थ्यांनी बीएड अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतले होते. या संख्येत यावर्षी घट जाली आहे. यंदा बीएड अभ्यासक्रमासाठी २८ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे यंदा ४ हजार ७२८ जागा बीएड अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिल्या आहेत. एमएड अभ्यासक्रमामध्ये गेल्यावर्षी ८३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते तर यंदा १ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. यंदा एमएड अभ्यासक्रमाच्या १ हजार ९५१ जागा रिक्त राहिल्या आहेत. २ हजार ९९५ जागा एमएडसाठी उपलब्ध करुन दिल्या होत्या मात्र यंदाही मोठ्याप्रमाणात जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती आकडेवारीनुसार कळाले आहे. त्यामुळे यंदा बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाकडे मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र राज्यातील महाविद्यालयांमध्ये आहे.

Comments
Post a Comment