शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांचे आदेश
प्रतिनिधी
मुंबई
राज्यात कोरोना व्हायरसचा संकट वाढल्यामुळे संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या काळात सर्व बोर्डाच्या शाळांनी पालकांकडून फी आकारु नये असे स्पष्ट आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिले आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा यावेळी मिळाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र केंद्र सरकारच्यावतीने ही संचार बंदी १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. या संचार बंदीच्या काळात देशभरातील कार्यालय आणि उद्योग बंद आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक अडचणी येत आहे. अशा परिस्थित सर्व बोर्डाच्या शाळांनी पालकांकडून शाळेची फी मागु नये असे स्पष्ट आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षणमंत्री यांच्या या आदेशामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Post a Comment