विद्यार्थ्यांना मिळणार आयडी ; कधीही पाहता येणार लेक्चर
मुंबई
प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाईन शिक्षण उपक्रमाला बळ देण्यासाठी तसेच शिकवलेले व्हिडीओ राखून ठेवण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने गुगलची मदत घेतली आहे. ही गुगल क्लासरूम यंत्रणा हाताळण्यासाठी राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी त्यांना लॉगइन आयडी देण्यात येणार आहेत. 13 जुलै रात्री 11.55 मिनीट वाजेपर्यंत शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नाव नोंदविता येणार असून पहिल्या टप्प्यात 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनादेखील सहभाग घेता यावा यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने गुगल क्लासरूमची मदत घेण्याचे ठरविले आहे. आता सद्या असलेल्या ऑनलाईन शिक्षण सुविधामध्ये विद्यार्थ्यांना केवळ एकदाच धडे पाहता येणार आहे. मात्र गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिकविण्यात येणारे वर्ग विद्यार्थ्यांना केंव्हाही पाहता येते आणि अभ्यास करण्यासाठी पुन्हा शिक्षकांचे शिकवलेले धडे पाहता येते. विद्यार्थ्यांना गुगलक्लास रूममध्ये सहभागी होण्यासाठी जी सूटचे आयडी तयार करावे लागतात. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गुगलवर स्पेस उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाईन क्लासरूममध्ये सहभागी होऊन आपले मत नोंदवू शकतो. त्याचप्रमाणे एकाचवेळी 250 विद्यार्थी यावेळी सहभागी होऊ शकतात. त्यामुळे हे गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. शिक्षकांना https://google.addingdimensions.in/Home.aspx या लिंकवर नोंदणी करायची आहे.
Comments
Please, the time to fill the link needs to be extended. Because, errors were coming a lot of the time ...
ReplyDeleteआता पुढचे ट्रेनिंग कधी असेल?
ReplyDeletePlease extend the time for registration.
ReplyDeletePlease, the time to fill the link needs to be extended.
ReplyDeletePlease extend the time for registration.
ReplyDelete