मुंबई
प्रतिनिधी
देशभरात कोरोना झपाट्याने वाढत असल्यामुळे देशभरातील शाळा बंद आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे मात्र शुक्रवारी सकाळी ऑनलाइन वर्ग सुरू असताना एक भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे सर्व पालक भडकले असून त्यामधील अनेक पालकांनी चक्क पोलीस स्थानक गाठले. तुम्ही वाचाल तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.
हिमाचल मधील सेंट ल्युकल या शाळेतील एका शिक्षक ऑनलाईन क्लास घेत होते. त्यावेळी अचानक क्लासच्या स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ लागला. व्हिडीओतून अश्लील आवाज येऊ लागले. त्या आवाजांमुळे मुलांचे पालकही हैराण झाले. त्यानंतर मुलांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान हे प्रकरण शाळेने गंभीरतेने घेतले असून ऑनलाईन क्लास सध्या बंद केले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार शाळेची इमेज खराब करण्यासाठी घडवून आणल्याचा संशय शाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या ऑनलाईन क्लासेस घेतांना शिक्षकांना मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Comments
Post a Comment