प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात पालकांचा हंगामा


ऑनलाइन शिक्षण थांबविणाऱ्या शाळांवर कारवाई   

मुंबई / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळात शाळा ऑनलाइन शिक्षण देत आहे मात्र फि न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वगळले असल्यामुळे पालक संतप्त झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात पालकांनी ठिय्या आंदोलन केले. संचालक दत्तात्रय जगताप यांनी संबधित शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आपले आंदोलन थांबविले. 

येणाऱ्या काळात ऑनलाइन शिक्षण थांबविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा यावेळी पालकांनी दिले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांची आता खैर नाही 

Comments

  1. शाळेची मक्तेदारी वाढली असुन, शिक्षण संस्था माफीया सध्या सरकार वर भारी पडत असुन, अर्धा पेक्षा जास्त राजकारणी लोकांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्याच शिक्षण संस्था आहेत, यात पालक वर्ग भरडला जाऊन लुटला जात आहे 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment