संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

 मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनाMAHADBT

 

            मुंबई, दि. 8 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झालेले आहे.

            त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नुतनीकरणाकरीता दि. १५ जानेवारी तर नव्याने प्रवेशीतांकरीता दि. ३१ जानेवारी या अंतिम मुदतीच्या आत महाडिबीटी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनीपडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर श्री.प्रसाद खैरनार यानी केलेले आहे.

Comments